तुळजापूर, दि. 10 : नागेशशास्त्री विठ्ठलशास्त्री नंदीबुवा अंबुगले, रा. रावळ गल्ली, तुळजापूर यांनी कोरोना महामारी निवारणार्थ दोन दिवसीय मन्युसुक्त होम- हवनाचे आपल्या राहत्या घरी दि. 15 व 16.05.2020 आयोजन केले होते. या वेळी नाका- तोंडास मास्क लावण्यात आले नाही. तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालनही करण्यात आले नाही. अशा प्रकारे त्यांनी कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण होण्याची निष्काळजीपणाची कृती जाणीवपुर्वक करुन विविध मनाई आदेशांचे उल्लंघन केले. यावरुन पो.ठा. तुळजापूर चे पोना- रवी भागवत यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 09.07.2020 रोजी नोंदवला आहे.
