नळदुर्ग, दि. 10 : सुन- पद्मजा ज्ञानेश्वर जाधव, रा. येडोळा, ता. तुळजापूर यांनी वाहन खरेदीसाठी माहेरहुन पैसे आणावेत याकरीता 1) ज्ञानेश्वर बलभिम जाधव (पती) 2)बलभिम जाधव (सासरा) 3)अनुसया जाधव (सासु) 4)दत्तात्रय जाधव (दीर), चौघे रा, येडोळा 5)गीता माने (नणंद) 6)दरी माने (नंदवा) दोघे रा. तुगाव, ता. उमरगा या सर्वांनी सुन- पद्मजा यांना वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. तसेच दि. 08.07.2020 रोजी 23.00 वा. सु. मौजे येडोळा येथे राहत्या घरी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पद्मजा जाधव यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 09.07.2020 रोजी नोंदवला आहे.
 
Top