खानापूर : बालाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथे कोरोनाबधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाच्या वतीने  पूर्ण गाव सील करण्यात आले आहे.

धोत्री  येथील एका व्यक्तीचा रविवार दिनांक ५ जुलै  अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने  गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले.कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील 16 जणांना तपासणीसाठी तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

तहसीलदार सौदागर तांदळे गटविकास अधिकारी प्रतापसिंह मरोड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुहास पवार, पोलीस उपनिरीक्षक जमदाडे यांनी प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.नागरिकांनी घराबाहेर पडू नये मास्क व सॅनीटायजरचा वापर करावा घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पुंडे आरोग्य कर्मचारी माळी, शिंदे , तलाठी अंकुश मॅडम, ग्रामसेवक भिमराव झाडे, पंचायत समिती सदस्य शिवाजी साठे ,ग्रामपंचायत कर्मचारी राजाराम ढोरमारे, संजय मुळे , संगणक परिचालक गणेश गोडसे, पोलीस पाटील दत्ता पाटील,
आशा कर्मचारी उर्मिला मुळे हे उपस्थित होते.
,
 
Top