उस्मानाबाद, दि. 30 :
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे आदेशानुसार दुचाकी वाहनांवर फक्त एक व्यक्तीस (चालकास) प्रवास करण्याची परवानगी असून अनेक दुचाकीस्वारांकडून या नियमाचे उल्लंघन होत असल्याने त्यांचेविरुद्ध पोलिस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. यानंतरही नगर पालिका क्षेत्रामध्ये अनेक दुचाकीस्वारांकडून वारंवार नियमाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अनावश्यकरित्या बाहेर न पडणे गरजेचे असून अनेक दुचाकी रस्त्यावर अनावश्यकरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे उस्मानाबाद व उमरगा नगर पालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असून तो रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी उस्मानाबाद व उमरगा नगर पालिका क्षेत्रामध्ये दुचाकींच्या वाहतूकीस प्रतिबंध करणे आवश्यक असल्याची खात्री झाली आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रामध्ये पुढील आदेशापर्यंत खालील नमूद बाबींसाठी होणाऱ्या दुचाकीच्या वाहतुकीव्यतिरिक्त अन्य दुचाकींच्या वाहतुकीस मनाई केली आहे.
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात जाणे-येणेसाठी ओळखपत्राआधारे दुचाकीवर प्रवासाची परवानगी राहील.
अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना व कोविड-19 चे प्रतिबंधाचे अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी, व्यक्तींना ओळखपत्राआधारे दुचाकीवर प्रवासाची परवानगी राहील. उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रांतर्गत अत्यावश्यक सेवेसाठी व कोविड-19 चे प्रतिबंधाचे अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी, व्यक्तींना नगर पालिकेने ओळखपत्रे द्यावीत.
फिरते दूध विक्रेत्यांना दूध विक्रीसाठी दुचाकीचा वापर करण्यास परवानगी राहील.