मुरूम, दि. 31 :  एक हाताने अपंग असतानाही मुरूम येथील कु श्रध्दा आप्पासाहेब मुंडासे हिने दहावीच्या परीक्षेत 92.20 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन करत उस्मानाबाद जिल्ह्यातुन अपंग विध्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवले आहे.

 येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कुलची ती विद्यार्थिनी कुमारी श्रध्दा ही जन्मतःच एक हाताने अपंग आहे.मात्र ती शिक्षणात कधीच मागे राहिली नाही.अपंगत्वावर मात करत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून अपंग विद्यार्थ्यांतुन जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या या यशाबद्दल नगरविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील,मुख्याध्यापक,शिक्षक तसेच महात्मा बसवेश्वर युवक मंडळ याबरोबरच शहरातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने कु श्रद्धाचे अभिनंदन करण्यात आले.
 
Top