उमरगा, दि. 31 : उमरगा तालुक्यातील मौजे तलमोड येथील शेत सर्वे क्र. 71 / 72 मध्ये 1)पीबीएआय या कंपनीचे मालक 2)प्रकल्प व्यवस्थापक- धर्मेद्र कुमार 3)उप व्यवस्थापक- प्रमोद चांडके 4) पर्यवेक्षक- भगवान चव्हाण 5) शेत मालक- विनोद मनोहर मोरे, रा. तलमोड यांनी विनोद मोरे यांच्या नमूद शेतातील डोंगर खोदुन मोठा खड्डा तयार केला. त्या खड्ड्यास कोणत्याही प्रकारची सुरक्षेबाबतची उपाययोजना न करता, सुचन फलक न लावता तो खड्डा न बुजता तसाच ठेवल्याने त्यात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे दि. 30.07.2020 रोजी 16.00 वा. सु. संतोष हेमला राठोड, रा. दयानंद नगर, कोळसुर (क.) तांडा, ता. उमरगा यांची मुलगी- अंजली संतोष राठोड, वय 12 वर्षे, भाची- प्रतिक्षा मधुकर पवार, वय 10 वर्षे, व भाचा- ओमकार राजुदास पवार, वय 11 वर्षे हे तीघेही त्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडल्याने बुडून गुदमरुन मयत झाले. अशा मजकुराच्या संतोष राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 5 आरोपींविरुध्द भा.दं.सं. कलम- 304, 34 अन्वये गुन्हा दि. 30.07.2020 रोजी नोंदवला आहे.

 
Top