उस्मानाबाद : येथे आरटीपीसीआर कोविड-19 तपासणी सुविधेचा ऑनलाईन उदघाटन गुरुवार दि. 23 जुलै रोजी दुपारी साडे बारा वाजता मुख्यमंत्री ना. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे या तपासणी सुविधेचा ऑनलाईन उदघाटन कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी साडे बारा वाजता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे हे प्रास्ताविक करणार आहेत. त्यानंतर प्रयोगशाळेची माहिती चित्रीकरणाद्वारे मुख्यमंत्री ठाकरे हे देणार असून विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंकरराव गडाख यांचे मनोगत होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे हे उदघाटनपर जनतेला संदेश देणार आहेत.