उस्मानाबाद, दि. 22 : भारतीय जनता पार्टीच्या उस्मानाबाद तालुकाध्यक्षपदी सांजा येथील राजाभाऊ पाटील यांची तर मावळते तालुकाध्यक्ष दत्ता सोनटक्के यांची जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. मंगळवार दि. 22 जुलै रोजी उस्मानाबाद येथे सदरील निवड समारंभ पार पडला. यावेळी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देवून सत्कार केला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्य विधी प्रकोष्ठचे संयोजक अॅड. मिलिंद पाटील, महाराष्ट्र राज्य बुद्धिजीवी प्रकोष्ठचे संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. व्यंकटराव गुंड, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनंतराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस सतीश देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक भारत डोलारे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.