काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील देशी दारू दुकान 13 मे 2020 रोजी फोडून हजारोंची दारु चोरट्यांनी लंपास केली होती याचाच तपास स्थानिक गुन्हे शाखे मार्फत सुरू असताना आज गुरुवार दि.24 रोजी रात्री 2.45  वाजेच्या सुमारास सावरगाव पारधी पेड़ी येथील तरूण मोटरसायकलने  बेकायदेशीर देशी विदेशी दारु घेवून जाणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक करण माने  यांना मिळाली होती. त्यानंतर लागलीच त्यांनी सावरगाव गाठून सापळा रचला व भानुदास जुज्जा काळे वय 40 मोटरसायकल वरुन जात असताना चोरीच्या  दारूसह ताब्यात  ताब्यात घेऊन  काटी येथून  चोरीस गेलेल्या मालापैकी टॅंगो संत्रा 180 मिलीच्या 48 बाटल्या किंमत 2496 रुपये व गुन्हात  वापरलेली .मोटरसायकल  किंमत 40,000  रुपये असा एकुण 42,496 रुपयेचा माल जप्त करून आरोपीची वैद्यकीय तपासणी करून  तामलवाडी पोलिस ठाण्यात भा.द.वि कलम 457,380 भादवि नुसार तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास तामलवाडी पोलिस करत आहेत.
 
Top