नळदुर्ग, दि. 17 :
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. 17 जुलै रोजी नळदुर्ग येथे कोरोनाबाबत जनजागृती, वृक्षारोपण, मास्क सॅनिटायजर, अर्सेनिक अल्बम 30 या गोळयाचे वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले.
कोरोना या संसर्गजन्य आजाराबाबत शिवसेनेच्यावतीने नळदुर्ग येथे जनजागृती अभियान पत्रकाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील इंदिरानगर येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कोरोनाबाबत जनजागृती करुन नागरिकांना मास्क, अर्सेनिक अल्बम 30 गोळया व सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, शिवसेनेचे राजेंद्र जाधव, माजी उपशहरप्रमुख शिवाजी धुमाळ, अफझल कुरेशी, बालाजी कोकणे, शाशिकांत घोडके, गुलाब शिंदे, राजेश माने, महेश घोडके, किशोर घोडके, महादेव म्हेत्रे, शमशोदिन शेख, सचिन शिदें, राज मुरमे, अनिल खबुले, राहुल घोडके, नितीन निकंबे, संतोष शिदे, रामेश्वर घोडके, आनिल घोडके, महादेव वाघमारे, सुदर्शन जाधव, शंकर घोडके, अजय पवार, रोहन मुळे, अझर शेख, भैरवनाथ सोनवणे, अजय मोरे, मारूती बाळु वाघमारे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव आदीजण उपस्थित होते.