उमरगा, दि. 17 : कोविड- 19 संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्याती सर्व सिमा विनापरवाना प्रवासास बंद आहेत. असे असतांनाही 1)लतीका अंबादास सोनकांबळे, रा. मानेगोपाळ, ता. उमरगा या दि. 15.07.2020 रोजी आराम बस क्र. ए. पी. 01 एम 298 ने प्रवास करत मुंबई येथून मानेगोपाळ येथे आल्या. तर, 2) मिरा काळे 3)सुनिता काळे, दोघी रा. माडज, ता. उमरगा या दोघी दि. 12.07.2020 रोजी बाहेर जिल्ह्यातून मौजे माडज येथे आल्या. तसेच 4) काशिनाथ वाडेकर व त्यांची दोन मुले, रा. हिप्परगाराव, ता. उमरगा हे तीघे दि. 13.07.2020 रोजी बाहेर जिल्ह्यातून मौजे हिप्परगाराव येथे आले. अशा प्रकारे नमूद सर्वांनी कोविड- 19 संसर्ग होण्याची शक्यता निर्माण करण्याचे निष्काळजीपणाची कृती केली आहे.
यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द पो.ठा. उमरगा येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.