उस्मानाबाद, दि. 17 : जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवाना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दि. 27 डिसेंबर 2019 अन्वये राज्यातील शेतक-यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली असून या योजनेची अंमलबजावणी चालू आहे. योजनेचा लाभ मिळण्या करिता शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करणे अनिवार्य आहे.
तरी ज्या शेतक-यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण केलेले नाही. अश्या शेतक-यांनी भौतिक अंतर फिजिकल डिस्टन्स चे पालन करुन आपले सरकार सेवा किंवा बॅंकेचे CSP सेंटरशी संपर्क साधून आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय श्रीवास्तवा, महा प्रबंधक, भारतीय स्टेट बँक, यांनी केले आहे.