तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापूर नगरपालिकेच्या हद्दवाढ भागातील शिवरत्न नगर भागांमध्ये पावसाळ्यात ही येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे,गेली कित्येक वर्षे झाला येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप निर्माण होत असून येथील नागरिक पाणी प्रश्नासाठी आमरण उपोषण करण्याच्या पवित्र्यात आहेत.
तुळजापूर खुर्द या प्रभागामध्ये शिवरत्न नगर भागाचा समावेश करून गेली कित्येक वर्षेचा कालावधी लोटला.तरी या भागासाठी पालिकेकडून पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.याचबरोबर पावसाळ्यात हि पाण्याचा प्रश्न उदभवत आहे.
शिवरत्न नगर येथे जवळपास ६० ते ७० कुटूंबाचा उंबरठा असून या ठिकाणी जवळपास ५०० नागरीक राहतात.या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी गेल्या काही वर्षखाली तुळजापूर खुर्द येथील तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून बोअरवेल घेऊन त्या ठिकाणी पाण्याची टाकी उभारणी केली आहे.मात्र या भागात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढ होत चालल्याने या बोअरवेल चे पाणी कमी अधिक प्रमाणात येत असल्याने पाणी तोकडे पडत आहे.
यामुळे येथील नागरिकाना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.तसेच विकतचे पाणी घेऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे तर काहींना पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात भटकंती करावी लागत आहे.
■बालाजी जाधव, नागरिक :- शिवरत्न नगर भागाचा नगर पालिका हद्दवाढ भागात गेली कित्येक वर्षे झाले समावेश होऊन हि येथे सोई सुविधा, नळ योजना राबिविल्या नसल्याने गेली कित्येक वर्ष झालं या भागाला पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे.पतसंस्थेने बोअरपाडून दिले आहे परंतु त्या बोअर ला हि अल्प प्रमाणात पाणी येत आहे.दि.२८ मे रोजी येथील नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर काही दिवस टँकर चालू केले नंतर मात्र ते बंद झाल्याने नागरिकांना आणखी पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे.तसेच पाणी प्रश्न लवकर न मिटविल्यास येथील नागरीका समवेत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा गेली सहा दिवस झाले नगर पालिकेला देऊन तरीही पाण्याची व्यवस्था केली नाही.
सन २००९ पासून शिवरत्न भागाच्या पाण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे,परंतु पालिका प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही.सध्या जवळच्या शेतकऱ्यांच्या विहीर,बोअर चे पाणी आणून नागरिक तहान भागवित आहेत.यामध्ये काही अबाल महिला,वयोवृद्ध नागरिक,शाळकरी मुलां मुलींना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

