काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा उस्मानाबाद येथे वास्तव्यास असलेले उस्मानाबाद येथील आदर्श नगर मधील जेष्ठ नागरिक तथा पत्रकार  प्रा.अभिमान हंगरकर यांचा वाढदिवस शुक्रवार दि.10 जुलै रोजी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे व सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आळणी येथील स्व आधार मतिमंद मुलींच्या शाळेतील (बालगृह) अनाथ मतीमंद मुलींना मान्यवरांच्या उपस्थितीत फळे, खाऊचे वाटप करुन अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

     यावेळी प्रा.रावसाहेब देशमुख, विशाल थोरात, प्रा.अभिमान हंगरकर, सौ.सुनंदा हंगरकर,श्वेता हंगरकर यांच्यासह स्व आधार मतिमंद मुलींच्या शाळेतील (बालगृह)जी.ए.थोडसरे, श्रीमती व्ही.डी.पोचळे मॅडम, टी.के.तवले,ए.डी.ओव्हाळ आदीसह विद्यार्थीनीं उपस्थित होते.
 
Top