तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी मातेच्या नगरीत संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगामुळे जिल्हाधिकारी यांच्या आव्हानास प्रतिसाद देत दि.११ शनिवार रोजी जनता कर्फ्यूला ला तुळजापुर करानी चांगला प्रतिसाद दिला.

प्रत्येक आठवड्याला दर शनिवारी जनता कर्फु असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील व्यापारी वर्गानी आपली दुकाने बंद ठेवली. शहरातील भाजी मार्केट ही बंद होती. शनिवारी जनता कर्फु असल्याने  शहरातील नागरीकांनी आपल्या घरीच राहणे पसंद केले. शहरात दिवसभर पोलीसांनी आपली पेट्रोलिगं ठेवली होती . माञ तोंडावर मास्क न  लावणाऱ्या टु व्हीलरवर डबल सीट व विनाकारन फिरणार्या नागरीकांना पोलीसांनी कायद्याचा बडगा दाखविला यामुळे तुळजापुर शहरातील मंदीर परिसर भवानी रोड, मेन रोड ,शुक्रवार पेठ मंगळवार पेठ आदीसह सर्व रस्त्यावर शुक शुकाट पसरला होता शहरातील बाजार पेठा जनता कर्फु असल्यामुळे साम सुम झाल्या होत्या शहरात पोलीसांनी तगडा बंदोबस्त लावला होता.
 
Top