तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर कोरोना साथीच्या रोगामुळे गेल्या मार्च महिन्यापासून बंद झाल्याने तुळजापुर शहराला अवकाळा आली आहे.

 श्री तुळजा भवानी मातेच्या नित्योपचार पुजा पारंपरिक पद्धतीने चालु आहेत. माञ श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात भक्ता विना अवकळा पसरली आहे.श्री मातेच्या नगरीत दररोज हजारोच्या संख्येने श्री देवी दर्शनासाठी भाविक येत होते माञ संपुर्ण भारतासह महाराष्ट्रात कोरोना या साथी च्या रोगाने धुमाकुळ घातला.यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील तिर्थ क्षेत्र बंद करण्यात आली या मध्ये तुळजापुर तिर्थ क्षेत्र  याला अपवाद नाही.


श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर व शहरातील परिसरा मध्ये कोरोना साथीच्या रोगामुळे शहरात दररोज सन्नाटा पसरला जातो.श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर बंद असल्याने व्यापारी वर्गातुन,पुजारी वर्गातुन मोठी निराशा पसरली आहे.व्यापार नसल्यामुळे व्यापारी मोठा अडचणीत सापडा आहे तर पुजारी वर्ग भाविक येत नसल्यामुळे गेली चार माहिने झाली मोठा संघर्ष करावा लागत आहे. व्यापारी वर्ग व पुजारी वर्गाना श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान ने अथवा.या राज्य शाषनाने कुठलीही तंटपुजी मदत केली नाही यामुळे व्यापारी वर्ग पुजारी वर्ग आपल्या या महामारीत मोठ्या संकटाला तोंड देत आहे. शहरातील श्री देवीच्या नावावर छोटे मोठे उद्योग करणाऱ्या चे तर मोठे हाल होत आहेत या चार माहिन्याच्या महामारीत  शहरातील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.  

तुळजापुरात लाखो रुपयाची उलाढाल ठप्प झाली आहे. तुळजापुर शहरातील छोट्या मोठ्या व्यापारी वर्गावर मोठे आभाळ कोसळे आहे दुकान उघडले धंदा नाही एक प्रकारे मोठी आर्थिक मंदी आली आहे.तसेचआर्थिक चन चन सर्वच क्षेत्रात आली आहे."श्री तुळजा भवानी माता नको अंत पाहु आता या संपुर्ण जगावरचे संकट दुर कर अशा भावना, सोशल मिडीयाच्या व्हॉटसअप फेसबुकवरुन केल्या जात आहेत.
 
Top