नळदुर्ग, दि. ११ :
महाविकास अघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात ठिक ठिकाणी दलित, बौद्धावर अन्याय अत्याचार वाढत चालला असून मागासवर्गीयावरील अन्याय अत्याचार रोकण्यास महाविकास अघाडीचे सरकार असमर्थ असल्याने सत्ताधारी महाविकास अघाडीच्या सरकारचा नळदुर्ग ता.तुळजापूर येथे रिपाइंच्या वतीने जाहीर निषेध करून व दि.११ जुलै १९९७ रोजी मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर मुंबई येथे आंदोलनात शहीद झालेल्या भिमसैनिकांना श्रध्दांजली वाहून विविध मागण्याचे निवेदन शासनाचे प्रतिनिधी म्हणून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे स.पो.नि. अमित मस्के यांना देण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या आदेशानुसार तुळजापूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना रिपाइं शहर शाखा नळदुर्ग ता.तुळजापूरच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पिंपळे गुरव पूणे येथे झालेली बौध्द तरुणाची हत्या,मुंबई दादर येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजग्रहाची मोडतोड,सह महाराष्ट्रात बौध्द ,मागासवर्गीयावरील अन्याय अत्याचारात वाढ होत आसल्या बद्दल महाविकास अघाडीच्या सरकारचा निषेध करून , मागासवर्गीयावरील अन्याय अत्याचारास वेळीच पायबंद घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, गायरान जमीनी अतिक्रमण धारकांच्या नावे करावी, रमाई घरकुल योजनेतील निधीत वाढ करून लाभार्थ्यांना प्रलंबित व नवीन परीपूर्ण प्रस्तावित रमाई घरकुल योजनतील हप्त्याचे त्वरित वाटप करावे ,नळदुर्ग ते अक्कलकोट महामार्ग रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे ,महाराष्ट्रातील अवैद्य धंदे बंद करावे आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी रिपाइंच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, रिपाइंचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, , अल्पसंख्याक अघाडीचे तालुका अध्यक्ष बाशीदभाई कुरेशी रिपाइंचे तालुका संघटक सुरेश लोंढे ,ईश्वर क्षिरसागर, सह कार्यकर्यांच्या सह्या आहेत.
