तुळजापुर : 

तुळजापुर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे रविवार (१९ जुलै) रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे रविवारी सोलापूर चा दौरा आटपून उस्मानाबाद येथे जात असताना माळुंब्रा ता. तुळजापुर येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी टोपे यांचं स्वागत करून पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.  यावेळी आरोग्य मंत्री यांना सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे, सावरगांवचे  युवा नेतृत्व राजकुमार बबन बोबडे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता डोके, रोहीत ठाकर, तुकाराम डोलारे, राहुल डोलारे, रामेश्वर माळी, सुधीर ठाकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top