तुळजापूर, दि. २० :

तुळजापूर शहरात महानेट  प्रकल्पाचे चालू असलेली कामे  चुकीच्या पद्धतीने होत असून ती कामे तात्काळ थांबविण्याची मागणी मनसेचे शहर उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी तुळजापुर तहसिलदार यांच्याकडे सोमवार रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर शहरामध्ये महानेट प्रकल्पाचे काम चालू असून सदर काम चुकीच्या पद्धतीने होत असून खोदलेल्या खड्ड्यातील माती ही सदर रोडवर टाकली जात आहे. त्यामुळे तुळजापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने सदर खड्ड्यांमध्ये पाणी साठवून कोणतेही अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच सदर कंपनीचे काम हे त्यांना नियम दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणे होत नसून त्यांचा मनमानी कारभार चालू असल्याचा आरोप करून  सदर कंपनीचे चालू असलेले काम तात्काळ थांबवावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदर काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुळजापूर शहर उपाध्यक्ष अविनाश पवार यांची स्वाक्षरी आहे.
 
Top