तुळजापूर, दि. 20 : डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील शिबीर दोन टप्प्यात संपन्न झाले. यामध्ये दोन्ही  टप्प्यातील मिळून 139 श्री सदस्यांनी रक्तदान केले.

कोविड १९ महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी रक्तदान करण्याचे जाहीर आव्हान केलेले आहे. त्या अनुषंगाने डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा, जिल्हा रायगड मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. त्यानुसार तुळजापूर खुर्द येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात प्रतिष्ठाण व शासकीय रक्तपेढी उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने  सोमवार दि. २० जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत शासकीय नियमांचे पालन करून दुसऱ्या टप्प्यातील रक्तदान शिबीर घेण्यात आले. दरम्यान, दि ०६ जुलै रोजी पहिल्या टप्यातील रक्तदान शिबीर राबविण्यात आले होते.  दोन टप्प्यात मिळून एकूण 139 सदस्यांनी रक्तदान केले.


 
Top