तुळजापूर, दि. 20 : येथील घाटातून सोलापूर मार्गावरुन येणारी जड व माल वाहतुक वाहनांना बायपास मार्गे तुळजापूर शहरात प्रवेश देवून घाटातून येणा-या जड व माल वाहतूक वाहंनाचा प्रवेश बंद करण्यात यावा, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समिती तुळजापूर तालुकाच्यावतीने तहसिलदार यांच्याकडे सोमवार रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे तुळजापूर येथे सोलापूर मार्गे येणा-या माल वाहतूक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सदरील सर्व वाहने तुळजापूर शहरात येत असताना सिंदफळ घाटाचा वापर करतात. सदरील घाटात अपघाती वळणे असून या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे सोलापूर मार्गे येणा-या सर्व जड वाहने व माल वाहतूक करणा-या वाहनांना बायपास मार्गे शहरात प्रवेश देण्यात यावा व घाटातून येणा-या वाहनांचा प्रवेश बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची एक प्रत माहितीस्तव तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तुळजापूर तालुकाध्यक्ष विजय भोसले, तालुका उपाध्यक्ष दिनेश पलंगे, संपर्कप्रमुख मंथन रांजनकर, शहराध्यक्ष शुभम भिसे, अक्षय जगदाडे, बाळासाहेब भिसे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.