तुळजापूर, दि. 20 : येथील सेतू सुविधा केंद्र अभावी गोरगरीब नागरिकांची होणारी हेळसांड होत असून लवकरात लवकर सेतू सेवा केंद्र चालू करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्ष तुळजापूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोना महामारीचा परिणाम संपूर्ण देशामध्ये होत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक चटके बसण्यास सुरुवात होत आहे. अशा परिस्थितीत तहसील कार्यालय तुळजापूर येथील सेतू सुविधा केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना खासगी महा- ई सेवा केंद्रामध्ये जाऊन जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करून आवश्यक लागणारे कागदपत्र काढावे लागत आहे. खासगी महा- ई सेवा केंद्रामध्ये शासनाने नेमून दिलेले दरपत्रक नसल्यामुळे चालकाकडून अवाढव्य त्यांच्या मर्जीप्रमाणे रक्कम घेवून नागरिकांना आरेराविची भाषा वापरून दमदाटी करत असल्याचा आरोप करुन निवेदनात पुढे म्हटले आहे की, शासनाने नेमुन दिलेल्या दरपत्रकाची फलक प्रत्येक महा- ई सेवा केंद्रामध्ये लावण्यात यावे, तोव लॉकडाऊन होण्यापूर्वी ज्या नागरिकांनी सेतू सुविधा केंद्रामध्ये विविध कागदपत्रे मिळवण्यासाठी आपली फाईल दाखल केली होती. त्या फाईल संदर्भातील कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे व दिव्यांग, निराधार, जेष्ठ नागरिक यांच्या पगारीसाठी फाईल सेतू सुविधा केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. तरी संबंधित नागरिकांचे फाईल त्रुटीमुळे मंजूर झाले नाहीत. अशा नागरिकांना तुटीची पूर्तता करण्यासाठी सेतू सुविधा केंद्र बंद असल्यामुळे त्याची पूर्तता करण्यात येत नाही . त्यामुळे जनतेला व जेष्ठ नागरिकाना नाहक त्रास होत आहे.त्यासाठी लवकरात लवकर सेतू सुविधा केंद्र चालू करण्यात यावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष तुळजापूर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा तुळजापूर तालुका उपाध्यक्ष जुबेर शेख यांनी दिला आहे.