तुळजापूर : कुमार नाईकवाडी
भारतीय जनता पार्टीचे तुळजापुर तालुक्याचे नूतन तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांचा सोमवार दि. 20 जुलै रोजी महाराष्ट्र प्रदेश सदस्य अनिल काळे यांच्या उपस्थितीत तुळजापूर तालुका मीडिया विभागाच्या वतीने तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संतोष बोबडे यांचा तुळजापूर मिडीया तालुका अध्यक्ष सचिन ताकमोघे व शहराध्यक्ष सागर कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा मीडियाचे उपाध्यक्ष संजय खुरुद, जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, सुशांत भूमकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय शिंगाडे ,सचिन रसाळ आदी उपस्थित होते.