ताज्या घडामोडी


तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जणाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या नगरीत धार्मिक पद्धतीने सोमवार दि. २० जुलै रोजी सोमवती अमावस्या व दिप अमावस्या असा दुहेरी संगम साधत श्रावण, मासाच्या पुर्व संध्येला घरोघरी दिप अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 सकाळी घरातील दिप असलेल्या समयी,आ व चिमनी आदीसह चिनी मातीच्या पंथ्याच्या व नागोबा,नरसिंहा प्रतिमेस आगरडा हराळी, बेलपञी फुले, वस्ञमाळ वाहुन यथासांग पुजा करुन भाजी भाकरीचा नैवद दाखविण्यात आला. धार्मिक रुढी परंपरेने दिप महोत्सव संपन्न झाल्यानंतर दिप महोत्सवा समोर घरोघरी घरातील अंधकार दुर व्हावा घरातील वाईट शक्तीचा नाश करा, आमंच्या घरात नेहमी प्रसन्नता व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली.

मंगळवार पासुन श्रावण मास सुरु होणार असल्याने या वर्षी श्रावण मासावर कोरोना संसर्गजन्य रोगाचे सावट आहे. पंच क्रोषीतील महादेव मंदीरात प्रशासना ने कोरोना साथी च्या रोगाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी बंदी घातली आहे.त्यामुळे प्रशासनाच्या वतीने श्रावण मासात घरीच महादेवाची पुजा करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top