नळदुर्ग, दि. १८ :

मनसेचे राज्य उपाध्यक्ष  हाजी सैफ शेख यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथे  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मास्क व सैनिटाइजरचे वाटप करण्यात आले. तसेच नळदुर्ग येथील होत असलेल्या उपजिल्हारुग्णालयाच्या नवीन इमारती मधील आवारात  वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष आलिम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के आदिजण उपस्थित होते.
 
Top