काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे  दि.18 जुलै रोजी सकाळी येथील भिमनगरमधील बुद्ध विहार मध्ये  साहित्यसम्राट, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 51 व्या स्मृतीदिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे दलित मित्र नंदू बनसोडे, गौतम बनसोडे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी दलित मित्र नंदू बनसोडे यांनी साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर गीत सादर करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक प्रतिभासंपन्न, क्रांतीकारी,सामाजिक जाणीव,ज्ञान, कादंबरीकार असे व्यक्तीमत्व असल्याचे सांगून महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात वैचारिक क्रांती घडवून आणणारे व महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात वैचारिक क्रांती घडवून  आणणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे खऱ्याअर्थाने महाराष्ट्राचे रत्न असल्याचे सांगितले.

    यावेळी दलित मित्र नंदू बनसोडे, गौतम बनसोडे, अच्युत कटारे, शुभम बोराडे, तानाजी सरोदे, सोहम बनसोडे, ताई सुरते, सोजरबाई बनसोडे आदींनी  पुष्पहार अर्पण करत अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.
 
Top