तुळजापुर : कुमार नाईकवाडी
संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे समाज सेवक तथा आडत व्यापारी अभिषेक शंकर कोरे यांच्या वतीने तालुक्यातील होनाळा येथील १५० नागरीकांना व वडगाव देव येथील १४० नागरीकांना प्रतिकार शक्ती च्या गोळ्या वाटप करुन कोरोना साथीच्या रोगा वरती मात करण्यासाठी माहिती व घ्यावयाची काळजी या संदर्भात मोफत पत्रक वाटप करण्यात आले. या दोन्ही गावातील नागरीकांनी या अभिनव उपक्रमा बद्दल उसस्फुर्त पणे साथ देऊन अभिषेक कोरे यांचे आभार मानले.
या वेळी होनाळा गावचे सरपंच अमृत जाधव,उपसरपंच सतिश सपकाळ शिवाजी भोसले दिलीप पाटील,आदीसह ग्रामसेवक तलाटी पोलीस पाटील उपस्थित होते.तसेच वडगाव देव गावातील राहुल भैय्या कदम तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब देवकते ग्रामसेवक,तलाटी पोलीस पाटील ग्रामंचायत कर्मचारी.पोलीस कर्मचारी आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.