उस्मानाबाद : नांदेड येथिल महाराष्ट्र दिव्यांग,वृध्द,निराधार,मित्रमंडळाच्या वतीने दैनिक लोकशाशन,महाराष्ट्र लाईव्ह चे संपादक आणि राष्ट्रीय चॉनल न्युज नेशन चे उस्मानाबाद प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर यांना समाजीक आणि पत्रकरीतेमधील कार्याबददल गौरव पत्र देवून सन्मानीत करण्यात आले.

उस्मानाबाद जिल्हयासह नांदेड जिल्हयातील दिव्यांग आणि निराधार व्यक्तींच्या आडचनी बाबत दैनिकात सतत बातमीच्या माध्यमातुन आवाज उठवून दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे निराधार लोकांना काहीसा आधार मिळाला.या समाधानातुन नांदेड येथिल महाराष्ट्र दिव्यांग,वृध्द,निराधार,मित्रमंडळाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आॅनलाईन गौरव पत्र देवून क्षीरसागर यांना सन्मानीत करण्यात आले.  
 
Top