तुळजापुर : कुमार नाईकवाडी

श्री तुळजाभवानी मातेच्या नगरीत संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. २२ जुलै पासुन ते दिनांक २६ पर्यत प्रशासनाच्या वतीने जनता कफ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दि.२१ मंगळवार रोजी संपुर्ण शहरात पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांच्या वतीने शहरातील नागरीकांना सुचना देण्यासाठी शहरात रुट मार्च काढण्यात आला होता. 


या रुट मार्च मध्ये तुळजापुर चे तहसीलदार सौदागर तांदळे, तुळजापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनमंत गवळी, तुळजापुर नगरीचे नगरअध्यक्ष सचिन रोचकरी, पी.एस.आय. दांडे, पी.एस आय रोटे, नगरसेवक विशाल रोचकरी, अभिजित कदम, शिवसेना नेते श्याम पवार, तुळजापुर नगरपरिषद चे अधिक्षक वैभव पाठक आदीसह पोलीस कर्मचारी, तहसील कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी व खाजगी सुरक्षा रक्षक सामील झाले होते. या रुट मार्च मध्ये अँलव्हान्स द्वारे तुळजापुर शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात येत होते.

बुधवार पासुन सलग पाच दिवस आपल्या शहरात जनता कफ्यू लागु होत असल्याने तरी शहरातील नागरीकांनी विनाकारण  घराबाहेर पडु नये, विनाकारण रस्त्यावर फिरत असल्यास दंडात्मक कारवाई करुन आपल्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, फक्त अत्यावश्यक सेवा हाँस्पीटल जवळील मेडीकल चालु राहतील तसेच दुध विक्रेतेसाठी सकाळी ६ ते ९ या वेळेत राहतील, तरी जनतेनी कामाशिवाय बाहेर पडु नये, असे या रुट मार्च मध्ये आवाहन करण्यात आले.

 
Top