काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटूंबातील सोमवार दि. 20 रोजी आलेल्या रिपोर्ट मध्ये आणखी एकाच कुटुंबातील सात महिन्याच्या बाळासह चार जण पॉझिटिव्ह निघाल्याचे समोर आले असताना काटीतील कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या सहावर पोहचली असताना सोमवार दि. 20 रोजी सरपंच, उपसरपंचासह दहाजणांनी प्रायव्हेट लॅबमध्ये स्वॅब दिला होता. या दहापैकी  आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून सरपंचासह अन्य  एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आल्याने गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे.येथील सरपंच यांनी मागील चार महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  काळजीपूर्वक प्रयत्न केला. या कालावधीत अनेकांशी संपर्क आल्याने येथील सरपंचास कोरोनाची लागण झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. काटीतील रुग्णाची संख्या आता आठवर गेली आहे. 

सरपंचासह अन्य एक जण पॉझिटिव्ह आलेला रुग्ण यांनी  कोरोणाबाधित असलेल्या डॉक्टरकडून उपचार केले होते. ते उपसरपंचाचे सख्ये चुलते आहेत. तर स्वॅब दिलेल्या पैकी उपसरपंच, ग्रामसेवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या सरपंच, डॉक्टर, आणि अन्य एक जणाचा हायरिक्स संपर्कातील 26  लोकांना तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आले. तर रविवारी 13 जणांना स्वॅब देण्यासाठी पाठविण्यात आले आहे. या सर्वांच्या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले असून अन्य कोरोनाबाधितांच्या  संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

वाढत्या रुग्णाच्या संख्येमुळे काटीकरांची धाकधूक वाढली  आहे. खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून येथील ग्रामपंचायतीच्या वतीने  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत गावात कोरोनाबाधितांचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.
 
Top