नळदुर्ग, दि. 21 :  वागदरी ता.तुळजापूर येथिल पत्रकार किशोर धुमाळ सह गुणवंताना  कोव्हिड १९  कोरोना जनसेवा २०२० चा   पुरस्काराने स्नमानित करण्यात आले.

सत्यशिल सामाजिक संस्था पुणे यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचा वागदरीत सामाजिक कार्यकर्ते डॉ. सिद्रामाप्पा खजूरे यांच्या हस्ते सदर पुरस्कार  देऊन गौरव करण्यात आला. 

 याप्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर  बिराजदार  , नागनाथ बनसोडे , ग्राप सदस्य रावसाहेब वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत  उपसरपंच दत्ता सुरवसे , तंटामुक्त समितीचे राजेंद्र पाटील, फत्तेसिंग ठाकुर,  ग्राप सदस्य महादेव बिराजदार ,रिपाइंचे एस.के गायकवाड,  विद्या बिराजदार, कमलबाई धुमाळ, बकुलाबाई भोसले, मुक्ताबाई वाघमारे, आशा कार्यकर्ती भारतबाई बिराजदार, अंगणवाडी कार्यकर्ती पदमीनबाई पवार, मदतनीस रूपाली जाधव , सह शिक्षक तानाजी लोहार किसन जावळे पत्रकार दयानंद काळूंके, राजूसिंग कचवा, ग्रा.प. कर्मचारी सर्जेराव चव्हाण, शालूबाई चव्हाण आदींना देखिल कोरोना जनसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
Top