तुळजापुर : कुमार नाईकवाडी

कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने बुधवार पासुन जनता कर्फ्यु लागु करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर तुळजापुर येथील तहसील कार्यालयात दि.२० सोमवार रोजी शहरातील बँक प्रतिनिधी यांची विशेष बैठक पार पडली.


 सदरील बैठकीत तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सर्व बँक प्रतिनिधीना बुधवार पासुन चार दिवस जनता कर्फ्यु लागु करण्यात आले आहे.वाढता कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील बँका चार दिवस बंद करण्यात याव्यात सर्व बँकानी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. यास शहरातील सर्व बँक प्रतिनिधीनी होकार पाठींबा दर्शविला.

 या वेळी तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी,  नगरसेवक विशाल रोचकरी, नगरपरिषद अधिक्षक वैभव पाठक आदीसह १५ ते १६ बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.  तुळजापुर शहरात बुधवार पासुन जनता कर्फ्यु असणार असून जनतेने मास्क,सॅनिटायझरचा वापर करून घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top