तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजा भवानी मातेच्या नगरीतील तुळजापुर नगरपरिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे यांची बदली बुलाढाण्यातील ग्रामीण भागातील नगरपंचायती मध्ये झाली होती. माञ त्यांची बदली रद्द झाल्याने पुन्हा तुळजापुर नगरपरिषद चे कामकाज मुख्याधिकारी आशिष लोकरे हेच काम पहाणार आहेत.
सध्या संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी पुन्हा नव्या जोशाने काम करणार यात तिळ माञ शंका नाही. या पुर्वी तुळजापुरात संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगावर अंकुश ठेवण्याचे काम त्यानी भरपुर केले. त्यांचा दांडगा अनुभव लक्षात घेता प्रशासकीय यंञने ने पुन्हा तुळजापुर नगरपरिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे यांना काम करण्याची संधी दिली आहे.