जळकोट, दि. १८ : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे ग्रामपंचायत कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

जळकोट ग्रामपंचायत कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन इरण्णा स्वने यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच पती संजय माने, ग्रामपंचायत सदस्य आशिष सोनटक्के, ग्रामपंचायत सदस्य संजय अंगुले, श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे, जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महादेव राठोड, माजी सैनिक अरुण मुसळे,नागनाथ किलजे, नागनाथ स्वामी, शिवाजी पालम पल्ले, राम जाधव, लहू कारले, विशाल जाधव, विशाल साखरे, सगर, राहुल धनशेट्टी, पप्पू कलशेट्टी आदीजण उपस्थित होते.
 
Top