तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे शिवसेनेच्या वतीने दि.१७ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या  रक्तदान शिबिरामध्ये ३१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवुन उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

     सध्या देशासह राज्यामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असुन या कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णांसाठी रक्ताची कमतरता भासत असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तामलवाडी येथील शिवसेनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१७ रोजी शिवरत्न नगर तामलवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदीरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये गावातील ३१ रक्तदात्यांनी तसेच काही मुस्लीम युवकांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सहभाग नोंदवला. रक्तसंकलनासाठी सह्याद्री रक्तपेढी उस्मानाबाद याना पाचारण करण्यात आले होते.

     रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मुकुंद गायकवाड,अमोल घोटकर,गणप्रमुख दत्तात्रय गवळी,कृष्णा घोटकर,पांडुरंग लोंढे,नागेश घोटकर,अशोक घोटकर,यानी परीश्रम घेतले.या शिबीरास तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी,अॅड.गजानन चौगुले,अॅड. आवारे यानी भेट दिली व सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
 
Top