काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोबडे यांची भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली असून बुधवारी तुळजापूर येथे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार नुतन तालुका अध्यक्षांच्या निवडी करण्यात आलेल्या असून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. बुधवारी झालेल्या निवडीत कळंब तालुका अध्यक्षपदी अजित पिंगळे यांची निवड झाली आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी नुतन तालुका अध्यक्षांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा अध्यक्ष नितीन काळे, भाजपचे प्रदेश पदाधिकारी दत्ता कोळी, सतीश दंडनाईक, तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, विक्रमसिंह देशमुख (काटी), रामदास कोळगे, नागेश नाईक, विजय शिंगाडे, वसंतराव वडगावे, पिंटू गंगणे, उपसभापती अण्णा सरडे, विशाल रोचकरी, पिंटू मुळे, काटीचे सरपंच आदेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपचे तालुकाध्यक्षपदी संतोष दादा बोबडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.