काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि. 14 रोजी कै. नागरबाई जालिंदर कोळी यांच्या 14 व्या पुण्यतिथीनिमित्त येथील भवानी प्रतिष्ठान व संशोधन संस्थेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर येथील ग्रामपंचायत कार्यालयात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी अर्सिनिक अल्बम 30 या होमिओपॅथीच्या गोळ्यांचे उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते 1300 बॉटलचे वाटप करण्यात आले.
तत्वपुर्वी सकाळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश कोळी यांच्या हस्ते कै. नागरबाई जालिंदर कोळी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. रोगप्रतिकारक अर्सिनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करताना सरपंच आदेश कोळी, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, तलाठी प्रशांत गुळवे, आरोग्य अधिकारी डॉ.अजित राठोड,प्रदीप साळुंके, उपसरपंच सुजित हंगरगेकर, पत्रकार उमाजी गायकवाड, ग्रा.प. सदस्य मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले, बापू वाडकर, डॉ. युसुफ मुजावर, डॉ. गोसावी,अनिल बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.