उस्मानाबाद, दि. 14 : रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद यांच्या वतीने शिक्षकांसाठी मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. 

'Digital Skills for Smart Teaching'  या शिर्षकाखाली विशेषतः शिक्षकांसाठी असणार्या या कार्यशाळेत दिनांक १४ जुलै ते १८ जुलै रोजी ३ कौशल्ये शिकविण्यासाठी व्हिडिओ व त्यासंबंधी प्रश्र्न व्हॉट्स्ऍप द्वारे पाठविण्यात येतील.या पध्दतीने पाच दिवस व्हिडिओ पाठवले जातील. सहावा दिवस सरावासाठी असेल. दिनांक २० जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने परिक्षा होईल, व उत्तीर्ण होणाऱ्या  सहभागी व्यक्तिंना प्रमाणपत्रे देण्यात येतील.सर.व शिक्षक बंधुभगिनींनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद चे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, सचिव इंद्रजीत आखाडे, प्रकल्प प्रमूख डॉ. अनार साळुंके यांनी केले आहे
 
Top