भुम, दि. 14 : कोविड- 19 साथीमुळे विवाह सोहळ्याच्या आयोजनास जिल्हा प्रशासनाची परवानगी व व्यक्तींची संख्या निश्चीती- बंधनकारक करण्यात आली आहे. याचे उल्लंघन करुन दत्ता पुंडलीक टाळके, वय 47 वर्षे, रा. सांगवी (राळे), ता. भुम यांनी दि. 29.06.2020 रोजी दुपारी 12.00 वा. मौजे सांगवी (राळे) येथे विवाह सोहळ्याचे आयोजन केले. तसेच सोहळ्यात उपस्थितांची गर्दी निर्माण करुन कोविड- 19 आजाराच्या संसर्गाची शक्यता निर्माण केली. यावरुन संबंधीत गावच्या ग्रामसेविका- श्रीमती सुषमा गणेश स्वामी यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन दत्ता टाळके यांच्याविरुध्द पो.ठा. भुम येथे दि. 14.07.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

 
Top