तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 हिंदु धर्मियाचा पविञ सण असलेल्या नागपंचमीला शनिवार दि.२५ जुलै रोजी संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाचे सावट असल्याने साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. श्री तुळजाभवानी मातेच्या  मंदीरात प्रवेश बंद  असल्यामुळे या वर्षी माहिला भगिनीना श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरातील होम कुंडासमोर पितळेच्या ठेवण्यात आलेल्या नाग देवताची इतिहासात प्रथमच  माहिला भगिनी ना नागदेवताच्या पुजे विना वंचीत राहावे लागले. यामुळे महिला भगिनीची या वर्षीची नागपंचमी सन कोरोनाच्या सावटाखाली होता.


श्री तुळजाभवानी मंदीरात दि.२५ शनिवार रोजी मंदीरातील होमकुंडा समोर  पारंपारिक पद्धतीने प्रति वर्षा प्रमाणे पंचधातुच्या नागदेवता ची मुर्ती ठेवण्यात आली होती. नागपंचमी दिनाचे औच्युत साधुन शनिवारी पहाटे श्री नागदेवता नागपंचमी दिनी प्रथम दुग्धा अभिषेक घालुन विधिवत पुजा करण्यात आली. या वेळी श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत वाकोजी बुवा, श्री भवानी शंकर मंदीराचे गुरुव दिनेश ईनामदार, उमेश ईनामदार, श्री देवीजीच्या चरण तिर्थ मंडळाचे सेवेदारी वर्ग श्री तुळजा भवानी मंदीराचे कर्मचारी मार्तंड दिक्षीत आदीसह मंदीर कर्मचारी उपस्थित होते.
                                            
  नागगपचंमी सण हा महिला भगिनीचा आकर्षक सण म्हणून ओळखला जातो. या नागपंचमी सणा निम्मीताने शहरातील बाजार पेठा मध्ये मोठ्या प्रमाणावर माहिला वर्गाची खरेदीसाठी मोठी गर्दी असते. परंतु यावर्षी प्रथमच संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगा ने संपुर्ण भारतासह महाराष्ट्रात  धुमाकुळ घातला आहे.नागपचंमी सणाच्या निम्मीताने शहरात ठिक ठिकाणी महिला भगिनीसाठी झोके बांधण्यात येत असतात. परंतु यावर्षी कोरोना आणि जनता कर्फ्यु असल्यामुळे  झोका घेळण्यास ही महिला वर्गाला मुकावे लागले. तसेच नागपंचमी सण आणि गवर हा पण माहिला भगिनी साठी आकर्षक सण समजला जातो. शहरात नागपचंमी आणि गवर सण हा प्रत्येक वर्षी शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला.पण या वर्षी नागपचंमी सणा तुळजापुरात साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शहरात माहिला भगिनी या नागपचंमी सनाचे औच्युत साधुन गल्लो गल्ली फेर धरतात. माञ या वर्षी कोरोना आल्यामुळे माहिलांनी घरात राहणे पसंत केले.
 
Top