तुळजापूर, दि. २४ :
उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधिक्षक राज तिलक रौशन यांनी राबविलेल्या 'एक गाव एक पोलीस' हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचा गौरव गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उस्मानाबाद पोलिसांच्या या कार्याची दखल घेत एक प्रकारे पाठीवर शाबासकीची थाप मारून ना. देशमुख यांनी त्यांचा उत्साह वाढवला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून उस्मानाबाद पोलिस कोरोना १९ च्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी 'एक गाव एक पोलीस' या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील कोरोना प्रतिबंधक स्वयंसेवकांच्या मदतीने गावकरी, ग्रामपंचायत, प्रशासन, आरोग्य विभाग यांच्यातील दुवा बनून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहे. पोलिसांनी हाती घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. कुटुंबप्रमुख या नात्याने मी जिल्हा पोलीस दलाच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत अशाभावना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाज माध्यमावर व्यक्त केल्या आहेत.