तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तुळजापूर येथील एस टी कॉलनी  येथे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने येथील कर्तव्यदक्ष नगसेवक विशाल रोचकरी यांनी मंगळवार दि. १४ मंगळवार रोजी घटनास्थळी जावून भेट देऊन ताबडतोब आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या व तसेच इमारतीतल्या इतर व्यक्तींना 108 मधून रूग्णालयात दाखल करुन क्वाँरनटाइन करण्यात आले.



तसेच येथील एसटी काँलनी परिसर सँनीटायजर करण्यात आला. तसेच त्या परिसरातील साफसफाई व स्वच्छ करून पावडर टाकण्यात आली. या सर्व परिसरात आरसेनिक आल्बम 30 गोळ्या व तसेच दुध व 8 दिवस पुरेल एवढा भाजीपाला देण्यात आला. या परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. हॆ सर्व कामकाज तहसीलदार तांदळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. यावेळी सर्व नगर परिषद कर्मचारी व विशाल रोचकरी उपस्थित होते.

 
Top