काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे रविवारी  प्रलंबित राहिलेल्या रिपोर्ट मध्ये उशिरा आलेल्या अहवालात ग्रामपंचायत सदस्यासह आणखी एकजणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून काटी येथील रुग्णांची संख्या आता 16 वर गेली आहे. तर दोन रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. 

रविवारी आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील 5 जणांना तुळजापूर येथे कोरोनटाईन करण्यात आले असून 7 जणांना होम कोरोंनटाईन राहण्यास सांगितले आहे. काटीत वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हि काटीकरांसाठी चिंतेची बाब असून ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रविवारी आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आणखी लोकांची शोध मोहीम सुरू असून आणखी कितीजणांना कोरोंनटाईन करावे लागणार त्यांचे रिपोर्ट काय येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. रुग्णाची संख्या वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाल्याचे व कोणाच्या संपर्कात येण्यास घाबरत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
 
Top