वागदरी : एस. के. गायकवाड

 इ.१२वी नंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या द्रष्टीणे अनेक पर्याय खुले असतात तरी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून जिद्द आणि चिकाटीने आपण निवडलेल्या क्षेत्रात प्रमाणिकपणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळेल तेंव्हा विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपली प्रगती साधावी व आपल्या गावचे नाव उज्वल करावे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर यानी वागदरी ता.तुळजापूर येथे बोलताना केले.

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सुनील बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वागदरी येते इ.१२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार उमाकांत मिटकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. 
   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उमाकांत मिटकर, मुख्याध्यापिका महादेवी जत्ते आदी होते.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यांनी केले. तर सुत्रसंचालन पत्रकरसंघाचे सचिव एस.के.गायकवाड यानी केले वआभार पत्रकार संघाचे किशोर धुमाळ
यांनी केले. यावेळी उपसरपंच दत्ता सुरवसे, शालेय व्यवस्थापण समितीचे उपाध्यक्ष सविता दत्तात्र्य पाटील ,पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड सामाजिक कार्यकर्ते
चद्रकांत वाघमारे, दत्ता पाटील, सहशिक्षक किसन जावळे, तानाजी लोहार, सर्जेराव चव्हाण,ओंकार चव्हाण सह यूवा कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top