तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी ते पिंपळा बु.हा दोन महिन्यापूर्वी बनवलेल्या दीड की.मी. रस्त्याचे काम ही निकृष्ट दर्जाची झाली असुन केवळ दोनच महिन्यामध्ये हा रस्ता उचकटण्यास सुरूवात झाली असल्याने पुढील काळात या रस्त्याचे काय होणार? असा प्रश्न सामान्य जनतेला पडत आहे.

       तामलवाडी ते पिंपळा बु. या रस्त्याची दुरावस्था होऊन नागरिकांचे हाल होत असल्याचे गेली अनेक वर्षे सतत वेगवेगळ्या वृत्तपत्रामधुन खराब रस्त्याची दुरावस्था झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिले होते. देवकुरूळी रस्त्यासाठी तसेच या पिंपळा बु रस्त्याच्या दुरूस्तीसाठी दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी देवकुरूळी रस्त्यावर उपोषण आंदोलनही केले होते.या आंदोलनानंतर एक वर्षांनी जिल्हा परिषद व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिलेल्या निधीमधुन तामलवाडी ते पिंपळा बु.या दीड की.मी. रस्त्याचे काम करण्यात आले.ज्या ज्या ठिकाणी अतिशय खराब रस्ता झाला आहे अशा तीन ठीकाणी तुटक तुटक काम करण्यात आले.परंतु अनेक वर्षानी होत असलेले हे काम संबधित गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे केले असुन केवळ दोनच महिन्यामध्ये रस्ता उचकटुण्यास सुरूवात झाली असल्याचे दिसुन येत आहे.मलीदा लाटण्यासाठी पुर्वीचा रस्ता न खोदता त्याच रस्त्यावर खडी टाकुन कामे करण्यात आली असुन रस्त्याच्या बाजुने मुरूम न भरता काही ठिकाणी माती लावुन लावलिजाव केले आहे.या रस्त्याचे काम करत असताना कोणी ईकडे फिरकलेही नसल्याचे काही नागरीकांनी बोलताना सांगितले आहे.अशीच निकृष्ट दर्जाची कामे होत राहीली तर प्रत्येक वर्षी खराब रस्ता दुरूस्तीसाठी आंदोलने करावी लागतील आणी रस्ता दुरूस्त होत नसल्याने पुन्हा लोकप्रतिनिधींच्या मागे तगादा लावावा लागेल व एकाच रस्त्याच्या कामासाठी वर्षानुवर्षे झगडावे लागणार हे मात्र निश्चित असल्याचेही काही नागरीकांनी बोलताना सांगितले आहे.
 
Top