तुळजापूर : कुमार नाईकवाडी
शहरात कोरोना या रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी (अतिदक्षता) म्हणून प्रभाग-8 मधील भागात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.
आमदार राणाजगतिजसिंह पाटील, आ.सुजितसिंहजी ठाकूर,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद (पिटु) गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब तानाजीराव डोंगरे मित्रपरिवाराच्या वतीने स्व-खर्चातून सोडीयम हायपोक्लोरायट (सॅनिटायजर) ने डोअर टू डोअर परिसर निर्जंतुकीकरण करणे दुसऱ्या मोहिमेस दि.२७ रविवार रोजी प्रारंभ केला.
पूर्व आणि पश्चिम मंगळवार पेठ भागात फवारणी करुन घेण्यात आली. त्यावेळी सुदर्शन डोंगरे, राहुलराजे कदम, वाहेद पटवेकर ,मुस्तफा शेख ,सागर कदम इत्यादीउपस्थित होते.