उस्मानाबाद, दि. 26 : उस्मानाबाद शहरातील रोटरी क्लब ऑफ उस्मानाबादचा नवीन  पदाधिकाऱ्यांचा  पदग्रहण सोहळा रविवार दि.26 रोजी सकाळी 11वाजता जे.एफ.अजमेरा रोटरी नेत्र रूग्णालय,एम आय डी सी परीसर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.


    या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा.डाॅ.सतीश कदम, पदग्रहण अधिकारी उपप्रांतपाल रो.भरत जाधव हे होते. उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत नुतन रोटरी क्लबचे अध्यक्ष अमरसिंह बाजीराव देशमुख व नुतन सचिव इंद्रजीत भाऊसाहेब आखाडे( पाटील) यांनी मावळते अध्यक्ष सुधाकर संपतराव भोसले, सचिव सुरज सतिश कदम यांच्याकडून पदभार स्वीकारला.

       या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. सतिश कदम, रो.भरत जाधव,नुतन अध्यक्ष अमरसिंह देशमुख,नुतन सचिव इंद्रजित आखाडे पाटील,मावळते अध्यक्ष सुधाकर भोसले, मावळते सचिव सुरज कदम, नुतन संचालक रविंद्र साळुंके, सुनिल गर्जे, नंदकुमार पिंपळे, रविकांत शितोळे, धनंजय वाकुरे, कृष्णाथ गांधी, शैलैश मेहता, सुधाकर भोसले, बाळासाहेब देशमुख, प्रदीप मुंढे, संतोष शेटे, अशोक मंत्री, अशोक सपकाळ, नितीन तावडे,प्रविण काळे, अभिजित पवार, राजेनिंबाळकर, अविनाश काळे, श्रीमती अनार साळुंके, प्रशांत पाटील, प्रमोद दंडवते, शाम भन्साळी, चित्राव गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.


 
Top