नळदुर्ग, दि. 26 :
स्था.गु.शा. चे पोउपनि- श्री पांडुरंग माने यांच्यासह पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मारलापल्ले यांचे पथक दि. 26.07.2020 रोजी पो.ठा. नळदुर्ग हद्दीत रात्र गस्त करत होते. दरम्यान चालक- धोंडीराम हीरु चव्हाण, रा. जळकोट, ता. तुळजापूर हा ट्रक क्र. के.ए. 32 डी 2233 ने सुमारे 7 ब्रास वाळु (गौण खनिज) विनापरवाना वाहुन नेत असतांना पथकास आढळला. यावरुन पथकाने तो ट्रक जप्त करुन नळदुर्ग पो.ठा. च्या ताब्यात दिला आहे. उर्वरीत कारवाई ही महसूल प्रशासनाशी संपर्क साधून केली जाणार आहे.