उमरगा, दि. 26 : 

पंडीत निवृत्ती महानुरे, वय 52 वर्षे, रा. मुरुम, ता. उमरगा हे मौजे बलसुर शिवारातील राधाकृष्ण तोष्णीवाल यांच्या शेतात दि. 25.07.2020 रोजी दुपारी काम करत होते. यावेळी शेत मजूर- बसवराज बाबुराव माळी, रा. रामलिंग (मु.), ता. निलंगा याने शेत मजुरीच्या वादावरुन पंडीत महानुरे यांच्या डोक्यात कठीन वस्तुने मारहाण केल्याने त्यांचा मृत्यु झाला. अशा मजकुराच्या खंडु पंडीत महानुरे (मयताचा मुलगा) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बसवराज माळी याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 302, 504, 506 अन्वये गुन्हा दि. 25.07.2020 रोजी नोंदवला आहे.
 
Top