नळदुर्ग, दि. 26 : 

गणेश सिध्द्दाराम कोरे, रा. जळकोट, ता. तुळजापूर हे दि. 23.07.2020 रोजी 11.30 वा. मौजे जळकोटवाडी येथील महाराजा हॉटेल च्या पाठीमागे थांबले होते. यावेळी गावातीलच- अभिषेक गंगणे, योगेश गंगणे, महादेव बारदाणे, प्रविण जाधव, रमेश कुंभार, ईश्वर जाधव अशा सहा व्यक्तींनी बँकेतील धनादेश न वटल्याच्या भांडणावरुन गणेश कोरे यांना लाकडाने व लाथाबुकक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. या मारहाणीत गणेश यांचा डावा हात मोडला. अशा मजकुराच्या गणेश कोरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन नमूद सहा व्यक्तींविरुद गुन्हा दि. 26.07.2020 रोजी नोंदवला आहे.

 
Top